⚡ ब्रेकिंग News

महाशिवरात्र निमित्त सुळे येथील यात्रोत्सव सिध्देश्वर तिर्थक्षेत्र सुळे *


 कळवत प्रतिनिधी : ( भगवान खरे )  - कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील जयदर सुळे येथील सिध्देश्वर तिर्थक्षेत्र महादेव मंदिर हे सतराव्या शतकातील असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. त्या मुळे सालाबादा प्रमाणे महाशिवरात्री निमित्त आज सुळे येथील सिध्देश्वर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या दर्शनाचा आनंद मिळाला. सुळे येथील श्रीक्षेत्र सिध्देश्वर मंदीरात महाशिवरात्री निमित्ताने दर्शनासाठी आलेले कळवण, सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार यांनी देखील घेतले शिवलिंग तीर्थक्षत्र यांचे दर्शन व परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती. यात देखील भाविकानी नेमाचे पालन करुन घेतले दर्शन व महाशिवरात्रीच्या यात्रे निमित्ताने अभोणा पोलीस स्टेशनचे सहा निरीक्षक. P S I नितीन शिंदे सह चव्हाण, चौधरी, आशिष बागुल, गवळी, गावित मॕडम सह पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील पांडूरंग गांगुर्डे, यांनी चोक भू-बंदोबस्त ठेऊन होते. यात देखील सुळे येथील ग्रामस्थानी व भाविकानी पोलीस प्रशासन याना देखील मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...