मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड )-
नाशिक प्रतिनिधी : अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने इंदिरानगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर कारवाई करत हुक्क्यासाठी वापरले जाणारे साहित्य जमा करत हॉटेल मालकावर कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. यावरून सदर पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल द पेरू फार्म इंदिरानगर येथे अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु आहे. यावरून पोलीस पथकाने हॉटेल पेरू येथे छापा टाकत हुक्का पॉट,हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हॉटेल मालक शंकर राजाराम पांगरे (३०,रा. टाईम्स ब्लॉसम अपर्त्मेंत चौथा मजला,पांगरे मला बडदे नगर,नाशिक ) व हॉटेलचा मेनेजर नितीन शांताराम आहिरे (२६,रा.पेरूचा बाग,इंदिरानगर ) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,उपायुक्त वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हेमंत नागरे, हवालदार भामरे,डंबाळे ,कोल्हे,भालेराव,दिघे,नांद्रे,येवले,कुटे,बागडे,फुलपगारे,दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक गांगुर्डे,अंमलदार सूर्यवंशी,सवळी,जोशी,महिला पोलीस शिपाई मल्लाह आदींच्या पथकाने केली.

Post a Comment