मुख्य संपादक- : जनार्दन गायकवाड
नवीन नाशिक - अंबड लिंक रोड परिसरात, गुटखा विक्री करणारे व्यवसायिकांवर अंबड पोलिसांनी छापा मारून धडक कारवाई.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 02/02/2023 रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाल्यानुसार अंबड गुन्हे पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना संजीव नगर अंबड लिंक रोड अंबड येथील आकाश पान शॉप या ठिकाणी राज्यात प्रतिबंधित असलेल्या पदार्थांची पान मसाला व गुटख्याची विक्री चालू असल्याबाबत माहिती मिळाली.
त्या वरून गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी नाव -१)अजहर वाईद अली हुसेन २)अब्दुल रहीम चौधरी व ३)मोहम्मद जाबीर मुस्ताक खान सर्व राहणार संजीव नगर अंबड लिंक रोड. नाशिक याचे दुकानावर छापा टाकून एकूण 2,393 रुपयाचा पान मसाला आणि गुटखा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे, त्यांचे विरुद्ध अंबड पो.स्टे भादवी कलम 328,188, 272, 273, / 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून. त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून.तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत.
घराचे वासे बदलले की घरही बदलत, अशी एक म्हण आहे. त्याचप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलताच, अंबड पोलीस स्टेशनच्या कारभारात बदल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मात्र समाधानी असल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे.

Post a Comment