मनमाड आगाराच्या नांदुरी - मनमाड बस क्रमांक MH14 -BT- 0109 हिला मतेवाडी ता चांदवड शिवारात भीषण अपघात झाला. अपघातात महिला कंडक्टर जागीच ठार तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.
मनमाड आगाराची बस नांदुरीहुन मनमाड कडे जात असताना देवळा मनमाड रस्त्यावर मतेवाडी शिवारातील गांगुर्डे वस्तीजवळ बस झाडावर आदळली. या अपघातात बसचा एका बाजूने चक्काचूर झाला आहे. अपघातात महिला बस कंडक्टर जागीच ठार झाली. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना
तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ह्या अपघातामध्ये जवळपास 10-15 प्रवासी जखमी असल्याचा अंदाज आहे.

Post a Comment