अंगणवाडी सेविकांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढा...( किरण मोहिते ).

 नाशिक : संपादकीय


 कामगार हितरक्षक सभा, यांच्या वतीने 

नाशिक महानगर पालिका आयुक्त चंद्रकांत फुलगुंडवार यांना निवेदन देण्यात आले 

नाशिक महानगर पालिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर त्वरित तोडगा काढून योग्य ते सहकार्य करणेबाबत  निवेदन..

संदर्भ - १) नाशिक मनपा/ मबाक / जा.क्र.६०/२०२३ /दि.३१/३/२०२३ भविष्य निर्वाह थकित निधी संदर्भात

संदर्भ - २) महासभा ठराव क्रमांक ६५,दि.१९/७/१०१८ ची अंमलबजावणी संदर्भात

 

   आम्ही कामगार हितरक्षक सभा,महाराष्ट्र या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नोंदणीकृत संघटनेच्या वतीने आपणांस वरील विषय व संदर्भानुसार नाशिक महानगर पालिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत विविध मागण्या ठेवत आहोत,आपणांस विनंती आहे कि,आपण या मागण्यांबाबत संवेदनशिलतेने व मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करून योग्य तोडगा व मार्गदर्शन कराल.

                      मनपा अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती कमकुवत असून यामध्ये विधवा, परित्यक्ता तसेच कौटुंबिक कलहाला बळी पडलेल्या पिडीत महिलांची संख्या जास्त प्रमाणात आहे. साल २०१८ सालापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर सातत्याने आम्ही पाठपुरावा करून प्रशासनाकडून योग्य त्या न्यायाची अपेक्षा करीत आहोत,त्यात काही अंशी प्रशासनाने दखलही घेतली आहे,मात्र अजूनही समाधानकारक तोडग्याची अपेक्षा आम्ही आपणांकडून करीत आहोत, म्हणून आपणांस हे निवेदन सादर करीत आहोत.


मागण्या पुढील प्रमाणे 

------------------------------------------

मागणी क्रमांक १) नाशिक महानगर पालिकेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या निर्णयानुसार ०८ जानेवारी २०११ पासून भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला होता,मात्र नाशिक महानगर पालिकेने २०१६ पर्यंत हा भविष्य निर्वाह निधी थकित ठेवून २०१६ पासून ते २०२३ पर्यंत भविष्य निर्वाह निधी भरला असून या थकित रकमेपोटी ₹.5,29,13,120/- एवढी रक्कम आपणांस भविष्य निर्वाह निधी कार्यालयास भरावयाचा आहे,यात नाशिक महानगर पालिका १२% व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १२% रक्कम भरावयाची आहे,असे आपल्या कार्यालयाकडून समजते आहे,परंत ही थकित रक्कम नाशिक मनपा प्रशासनाकडून भरण्यास दिरंगाई झाली असल्याने सदरहू थकित संपूर्ण रक्कम आपणच भविष्य निर्वाह निधी विभागास अदा करावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अतिशय तुटपुंजे असून आताचा चालू भविष्य निर्वाह निधी व थकित भविष्य निर्वाह निधी असे १८००/- रक्कम जर त्यांचे मानधनातून कपात झाल्यास त्यांचे जगणे कठिण होणार आहे, तेव्हा या रकमेचा बोजा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर न टाकता नाशिक मनपाने ती पूर्ण अदा करावी.


मागणी क्रमांक २) २०१८ सालापासून १३६ अंगणवाड्या पटसंख्या अभावी बंद करण्यात आल्या होत्या, याबाबत माजी आयुक्त मा.तुकाराम मुंढे यांनी महासभमध्ये याविषयी विचारविनिमय न करता परस्पर निर्णय घेऊन १३६ अंगणवाड्या बंद केल्या होत्या,यावर नाशिक महानगर पालिकेतील सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींनी 

महासभा ठराव क्रमांक ६५,दि.१९/७/१०१८ मजूर करून अंमलबजावणी करण्यासाठी आदेश काढला,त्यानुसार त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यामध्ये मनपा महिला व बालकल्याण विभागाने नेहमीच दिरंगाई करून महिलांच्या फाईल्स नाकारल्या आहेत,या १३६ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामाची नितांत गरज असून पुढील शैक्षणिक वर्षामध्ये या अंगणवाड्या सुरू करण्यासाठी मनपाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा.


मागणी क्रमांक ३) १ एप्रिल २०२३ च्या शासनाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ₹.१०,०००/- मानधन करण्यात आले आहे, त्यानुसार नाशिक महानगर पालिकेतील मनपा अंगणवाडी मुख्यसेविकांना १५,०००/-,अंगणवाडी सेविकेला १०,०००/- व अंगणवाडी मदतनीस यांना ९,५००/- ही मानधन वाढ करण्यात यावी.


मागणी क्रमांक ४) कोविड काळात मनपा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोविड बाधित रूग्णांच्या परिसराचे सर्वेक्षण,तसेच आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्याचे काम देण्यात आले होते,यामध्ये शारिरीक असक्षमता व कौटुंबिक अडचणींमुळे २० अंगणवाडी कर्मचाऱ्याना त्या काळात रूजू होता आले नाही,त्यांचे याबाबत लेखी म्हणणे ही स्विकारले गेले नाही व एकतर्फी निर्णय घेऊन प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त केले आहे,२५-३० वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष कारण समजून न घेता कार्यमुक्त करणे कितपत योग्य आहे,कोविड काळात इतर विभागातील काही कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावण्यामध्ये असक्षमता दाखविली असता,त्यांचेवर अशा प्रकारची कार्यवाही न करता फक्त पूर्व विभागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आकस ठेऊन ही कार्यवाही करणे,हा सरळ-सरळ भेदभाव आहे,तरी या कर्मचाऱ्यांना सेवेत रूजू करून घेणे.


मागणी क्रमांक ५) कोविड काळात मनपा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण व सुरक्षितता राखण्यासाठी योग्य त्या सुविधा मनपा प्रशासनाकडून देण्यातआल्या नव्हत्या,जीव धोक्यात असणाऱ्या या महामारीची जबाबदारी मनपाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नये,असे आम्ही निवेदनाव्दारे कळविल्यानंतर अतिशय हलक्या दर्जाचे तुटपुंजे साहित्य पुरविण्यात आले होते,याच काळात काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करतांना कोविडची बाधा झाली, या कर्मचाऱ्यांना लागण झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील लागण होऊन काहींचा यामध्ये मृत्युदेखील ओढवला आहे,मात्र मृत्युच्या दाढेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची किंवा त्यांच्या परिवाराची दखल मनपा प्रशासनाकडून घेतली गेली नाही, त्यापैकी सातपूर विभागातील दिवंगत योगिता प्रल्हाद बोरसे (अंगणवाडी मदतनीस) व पंचवटी विभागातील दिवंगत कुंदा शंकर दळवी (अंगणवाडी मदतनीस) या भगिणींना मृत्यु ओढावला आहे,मात्र आजतागायत त्यांच्या कुटुंबियांना नाशिक मनपा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई मिळालेली नाही,असे आमच्या निदर्शनास आले आहे,तेव्हा ही सुध्दा आपल्या प्रशासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारी दुय्यम वागणूक असून मृत पावलेल्या कुटुंबातील वारसांना ५०,०००००/- (पन्नास लाख रूपये) शासन व प्रशासनाकडून त्वरित मिळावे शिवाय कुटुंबातील एका व्यक्तिंस मनपाच्या सेवेत कामावर घ्यावे.


वरील प्रमाणे आम्ही लिखित स्वरूपात आपणांस आमच्या लेखी मागण्या स्पष्ट केल्या आहेत,यावर संवेदनशिलतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आपण विचार करून आमच्या सर्व मागण्या मान्य कराल ,अशी आशा आम्ही बाळगतो,तरी याबाबत आपण लेखी खुलासा त्वरित करावा,अशी आग्रही मागणी केले आहे. यावेळी उपस्थित 


किरण मोहिते. (अध्यक्ष)लिलाताई शेवाळे(उपाध्यक्ष)चैतालीताई भालेराव(सेक्रेटरी )कृष्णा शिंदे (खजिनदार) सदस्य-माधुरीताई भार्गव,सुशिलाताई साळवे,जबिनताई खतिब,सविताताई लोखंडे,सुनंदाताई धनगर,शोभाताई सोनार,सुनिताताई भोईर

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...