डॉ. आंबेडकर जयंती निमित्त घोटी येथे शाहीर उत्तम गायकर याचा समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर !



 नासिक तालुका  प्रतिनिधी,

घोटी -भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालय तथा केंद्रीय संचार ब्युरो पुणे व क्षेत्रीय प्रचार कार्यालय नाशिक आयोजित प्रबुद्ध मित्र मंडळ घोटी यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वर्ल्ड बुक रेकॉर्ड नोंद तथा मा.राज्यपालांच्या हस्ते सन्मानित शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घोटी येथे आयोजित करण्यात आला होता .

 या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी केंद्रीय संचार ब्युरो नाशिक , कार्यक्रम अधिकारी सदाशिव मलखेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती सांगितली .

 याप्रसंगी सपोउनि शिवाजी जुंद्रे यांनी घोटी गावातील माता भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजेत. त्याबरोबरच लहान मुलांवर बाल संस्कार झाले पाहिजे .आणि त्या अनुषंगाने विविध धार्मिक , सांस्कृतिक ,ऐतिहासिक, कार्यक्रमाचे आयोजन करुन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाहीरांकडून समाजप्रबोधन शाहिरांकडून होतय ही अभिमानाची गोष्ट आहे . आपल्या घोटी गावामध्ये कोणताही सण , उत्सव , जयंती असो अतिशय आनंदात आणि शांततेत , कायदा सुव्यवस्था राखून केली जाते याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे गौरव उद्गार सपोउनि शिवाजी जुंद्रे यांनी काढले .

यावेळी आंबेडकरी चळवळीतील शाहीरी जलशातील पारंपरिक व समाजप्रबोधनपर गीतांचे सादरीकरण करत आनंदतरंग कलापथकाचे शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांनी उपस्थितांची मने जिंकली . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकरराव दाभाडे , देविदास साळवे ,भारुडकार शिवाजी गायकर, प्रशांत भिसे, दुर्गेश गायकर ,रामकृष्ण मांडे ,नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक ओमकार गायकर नामदेव गणाचार्य सुरेश गायकर पंढरीनाथ भिसे यांनी परिश्रम घेतले .

 या कार्यक्रमासाठी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर , पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे ,सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे, पोलीस हवालदार धर्मराज पारधी ,घोटी ग्रामपंचायत मा. सरपंच संजय आरोटे ,रूपालीताई रुपवते ग्रामपंचायत सदस्य , मदन रुपवते मा. सरपंच , सुनील शिंदे पत्रकार प्रबुद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष मारुती रूपवते ,संजय सोनकांबळे,ग्रामपंचायत सदस्या वैशाली गोसावी , चंद्रकांत रुपवते , तुषार रुपये ,रवी रुपवते आदी मान्यवर उपस्थित होते .प्रबुद्ध मंडळाचे अध्यक्ष यांनी आभार मानले .महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली .

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...