*देसराणे ग्रामपंचायत येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती उत्साहात साजरी*




 कळवण प्रतिनिधी : भगवान खरे

कळवण तालुक्यातील देसराणे ग्रामपंचायत मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

  सर्व प्रथम म.वि.प्र. चे माजी संचालक  नारायण दगाजी हिरे. यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. व अभिवादन करण्यात आले. त्या नंतर उपसरपंच. कुंदन हिरे, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

 या कार्यक्रमाप्रसंगी म.वि.प्र. चे माजी संचालक  नारायण दगाजी हिरे , सरपंच भगवान वाघ , उपसरपंच कुंदन हिरे , सदस्या वर्षाताई रविंद्र हिरे , सपना जगदीश खरे , सिंधुबाई बहिरम , माई गांगुर्डे , सदस्य सचिन बहिरम , शिवदास पवार , मंगेश सोनवणे , ग्रामसेवक एन.व्ही.रामोळे , भावराव हिरे , भाऊसाहेब हिरे , जवाहरलाल हिरे , अमोल हिरे , संदीप हिरे , भगवान कुवर , विनोद कुवर , ग्रामपंचायत कर्मचारी बिपीन हिरे , रविंद्र सोनवणे आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...