संपादकीय:
नाशिक दिनांक 24 मे 2023 रोजी मनपा मुख्य अभियंता श्री. वंजारी साहेब यांना स्मरणपत्र देण्यात आले सहा महिन्यापूर्वी तुलसी आय हॉस्पिटल च्या पाठीमागील बाजूला मनपाचा ओपन स्पेस भूखंड तसेच सात्विक नगर हनुमान मंदिराच्या पाठीमागे मनपा भूखंड आनंद नगर हरी संकुल च्या मागच्या गेटला लागून असलेला मनपा नाशिकचा भूखंड पाखल रोड रोड नाशिक भूखंडाच्या समस्या संदर्भात सहा महिन्यापूर्वी निवेदन देण्यात आले होते परंतु त्या निवेदनावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आज पुन्हा मुख्य अभियंता यांना सदर भूखंडा संदर्भात स्मरण पत्र देण्यात आले सदर भूखंडावर अतिक्रमण करण्यात येते तसेच रात्रीच्या वेळेस मद्यपितेचे दारूच्या पार्ट्या करतात सदर ठिकाणी प्रेमी युगलांचा सुळसुळाट असतो अशा कारणास्तव भूखंडाच्या बाजूला राहणाऱ्या रहिवाशांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो त्यासंदर्भात सदर भूखंडावर चारही बाजूने संरक्षण भिंत उभारून ग्रीन जिम ची व्यवस्था करण्यात यावी या कारणास्तव आज परत एकदा स्मरण पत्र देण्यात आले त्याप्रसंगी नासिक आंदोलन प्रमुख नाबिंदर सिंग अलूवलिया, प्रभाकर वायचळे, अनिल कौशिक, चंदन पवार, स्वप्निल घी, प्रकाश कनोजे, अमर गांगुर्डे, प्रदीप लोखंडे, चंद्रशेखर महानुभाव व गिरीश उगले पाटील उपस्थित होते.



Post a Comment