लासलगांव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा डाव फसला. चोर फरार..


 तालुका प्रतिनिधी-: हेमंत जाधव

लासलगाव येथील विंचूर रोडवरील ॲक्सिस बँकेचे सुमारे १४ लाख ८९ हजार ४०० रुपये रोख रक्कम शिल्लक असलेले एटीएम मशीन ४ चोरट्यांनी आज पहाटे चार वाजेच्या सुमाला चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र लासलगांव पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच या चोरांनी मारुती इर्टिका या सफेद रंगाच्या गाडीतून मशीन फेकून पालयण केले.
         सविस्तर वृत्त असे की, लासलगांव येथील विंचूर रोडवरील ॲक्सिस बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएम मशीनची पहाटे ३ वाजता गस्तीसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडुन पहाणी करुन गेल्यानंतर ३.३०-३.४५ वाजेच्या सुमारास एटीएममध्ये चार आज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत फाउंडेशन नसलेल्या एटीएम मशीन अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्यांनी सोबत आणलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या इर्टिगा (क्रमांक एम एच १५ ए झेड ०५७) या वाहनात टाकून ४.११ मिनिटांच्या सुमारास पलायन केले. याची माहीती एटीएम सुरक्षा यंत्रणेकडून लासलगाव शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना देण्यात आली. शिंदे यांनी तातडीने ही माहिती लासलगांव पोलीस ठाण्याला कळवली. घटनेची माहीती मिळताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्ष राहुल वाघ यांनी तातडीने परिसरामध्ये नाकाबंदी केली. माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार देवडे पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एटीएम मशीन सह चोरट्यांनी विंचूरकडे पलायन केल्याचे दिसून आले. त्यानुसार लासलगांव पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी विंचूर कडे वेगाने येऊन तेथील सीसीटीव्ही बघितला असता चोरटे निफाडच्या दिशेने गेल्याचे दिसून आले.
     चोरट्यांचे वाहन निफाडच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिस नाईक योगेश शिंदे, पोलिस कर्मचारी सुजित बारगळ यांनी एका खाजगी गाडीद्वारे या चोरट्यांचा पाठलाग केला. पोलीसांचे पथक आपल्या मागे असल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच नाशिक - छत्रपती संभाजी नगर रोड वरील बोकडदरे शिवारात चोरट्यांनी एटीएम मशिन पोलिसांच्या खाजगी गाडीच्या दिशेने फेकुन दिले. पुढे बऱ्याच अंतरावर पाठलाग केला परंतु चोरटे पळुन जाण्यात यशस्वी झाले. सदर एटीएम मशीन रोख रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

"लासलगांव परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने येथल जनता धास्तावलेली आहे. लासलगांव येथे चोरीचे सत्र सुरुच असल्याने पोलीसांपुढे मोठे आवाहन निर्माण होत आहे. लासलगांवसह परिसरातुन दुचाकी, चारचाकी वाहने, शेळ्या, सोने-चांदी व व्यावसायींकाचे दुकान फोडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी नाकाबंदी व वाहन तपासणी करणे गरजेचे आहे अशी कुजबुज ऐकवयास मिळत आहे."
      पोलिसांच्या सर्तकतेमुळे एटीएम मशीन मधील कोणतीही रक्कम चोरट्यांना चोरी करता आली नाही. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस कर्मचारी प्रदीप अजगे, कैलास महाजन, ए. एस. आय. नंदकुमार देवडे, हवालदार देवा पानसरे, होमगार्ड पगारे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, नाशिकचे पोलीस उपअधीक्षक सुरेश भामरे, निफाड यांनी घटनास्थळाची पाहणी करत माहिती घेतल्याचे समजते.

"मारुती सुझुक कंपनीच्या क्रमांक एम एच १५ ए झेड ०५७ सदरची गाडीबाबत कुणाला कोणतीही माहीती असेल किंवा मिळाल्यास तात्काळ लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क करावा. माहिती देणाऱ्याबाबत गोपनीयता ठेवली जाणार आहे. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळेस सतर्क रहावे. राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लासलगांव पोलीस ठाणे"

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...