वनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, करंजवण येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
Maharashtra Maza news0
तालुका प्रतिनिधी - हेमंत जाधव
वणी-करंजवण शिवारात अज्ञात पुरुषाचा मृतदेह,आढळुन आलाअसुन अकस्मात मृत्युची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे.वणी पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार लखमापुर कोशिंबे या रस्त्यावरील लगतच्या चारीत अंदाजे 30 ते 35 वर्ष वय असलेला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळुन आला आहे.करंजवण पोलिस पाटील संदिप शार्दुल यांनी वणी पोलिसांना ही माहीती दिली.शरिराने मजबुत ,चेहरा गोल ,रंगाने काळा सावळा ,केस काळे व लांबट ,दाढी मिशी वर्णनाचा ,अंगात पोपटी हिरव्या रंगाचा हाफ शर्ट,जांभळ्या रंगाची नाईट पँट ,डाव्या हातावर अजय नाव ,उजव्या हातावर आई नाव गोंदलेले आहे. याबाबत अधिकृत माहीती असल्यास,वणी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे. वनी पोलीस स्टेशन- संपर्क: 02557- 220133 पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे मो.नं.- 8805013603
Post a Comment