*कामगार आयुक्तालयातील अधिकारी निशा आढाव लाच स्वीकारताना अटक*


 संपादकीय : जनार्दन गायकवाड

कामगार आयुक्तालयातील अधिकारी निशा आढाव लाच स्वीकारताना अटक
 नाशिक-तक्रारदार -पुरुष, वय- 40 वर्ष. रा.नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,
*निशा बाळासाहेब आढाव* वय 53 वर्ष व्यवसाय - दुकाने निरीक्षक, श्रेणी 1, वर्ग 3 कामगार उपायुक्त कार्यालय,उद्योग भवन, आकाशवाणी टॉवर, तिरुपती टाऊन, फ्लॅट नंबर 17, गंगापूर रोड, 
 आज दिनांक 15/06/2023 तक्रारदार हे हॉटेल व्यवसायी असून ते नासिक येथे चालवीत असलेल्या हॉटेल मध्ये दिनांक 13/6/23 रोजी बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करून त्याबद्दल निशा आढाव यांनी केलेल्या तपासणी दरम्यान त्यांचा नीरंक अहवाल पाठऊन त्यांच्यावर बाल कामगार असल्यासंदर्भात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारा कडे आज दिनांक 15/6/23 रोजी पंचासमक्ष 5000/-रुपये ची लाचेची मागणी करून सदर 5,000/- रुपये लाचेची रक्कम कामगार उपायुक्त कार्यालय, नासिक येथे पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
 *मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* 
पोलीस अधीक्षक, लाच लचपत विभाग नाशिक, यांच्या मार्गदर्शनाखाली
 पोलीस नाईक मनोज पाटील.
 पोलीस नाईक अजय गरुड,
 महिला पोलीस शिपाई शितल सूर्यवंशी. यांनी सापळा यशस्वी केला .

 महाराष्ट्र माझा न्युज च्या माध्यमातून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक- 
02532578230,

*टोल फ्री क्रमांक १०६४ .*

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...