नासिक प्रतिनिधी :
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या प्रमुख संपदा दीदी हिरे यांच्या मार्गदर्शनाने के.बी.एच. विद्यालय पवन नगर येथे मा.मुख्याध्यापक श्री उमेश देवरे ( बापूसाहेब ) यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयातील महिला कल्याण व तक्रार निवारण समिती व विशाखा समिती अंतर्गत दि. २१/०६/२०२३ बुधवार रोजी जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला योग शिक्षिका चंचल फरगडे यांचा परिचय श्री प्रदीप हिरे यांनी करून दिला व त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वंदना पाटील मॅडम यांनी सत्कार केला.त्यांनी जागतिक योगा दिना विषयी सखोल माहिती दिली. तसेच प्राणायम, ताडासन,वृक्षासन,भूजंगासन,मानेचे,कमरेचे सुक्ष्म हालचाली इत्यादी योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले..
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. उमेश देवरे सर यांनी योग दिन साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगितला व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले व आभार कविता सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment