चांदवड प्रतिनिधी: हेमंत जाधव
चांदवड पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेल्या . उप पोलीस अधीक्षक सविता गर्जे यांनी चांदवडचा पदभार स्वीकारताच चांदवड शहरातील बेशिस्त वाहन चालकांसह अवैद्य गुटखाविक्री, अवैद्य देशी दारू व अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध जोरदार कारवाई केली...चांदवड शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड ही जप्त करण्यात आला आहे...आज वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार चांदवड पोलीस स्टेशन तर्फे गेल्या दोन-तीन वर्षापासून विविध कारवाई मध्ये जप्त केलेला देशी दारूचा मध्य साठा तो आज चांदवड पोलीस स्टेशनच्या मागील पटांगणात पंचांसमोर मोजून ११८५ (नग) दारू बॉटल बाजारभावाप्रमाणे 80 हजार तीनशे रुपयांचा मध्ये साठा नष्ट करण्यात आला. यावेळी चांदवड पोलीस स्टेशन च्या उप पोलीस अधीक्षक सविता गर्जे, उप पोलीस निरीक्षक सुरेश चौधरी, रवींद्र जाधव नये, पोलीस हवालदार दिनेश सूळ, अमित सानप, विक्रम बसते, भूषण सूर्यवंशी, तसेच होमगार्ड उपस्थित होते.

إرسال تعليق