⚡ ब्रेकिंग News

कुंभमेळा तयारीवर संत समाजाचा संताप; अखाड्यांच्या नावावर कोट्यवधींची बिले, पण निधी शून्य असल्याचा आरोप!


 नाशिक जिल्हा प्रतिनिधी: प्रवीण कासार 
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून संत समाज आणि प्रशासनात वाद निर्माण झाला आहे. पंचायती अखाडा बडा उदासीन निर्वाणचे महंत डॉ. बिंदू महाराज यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. अखाड्यांना निधी न देता त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची बिले तयार केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महंत डॉ. बिंदू महाराज यांनी दावा केला की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात अखाड्यांना एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. उलट त्यांच्या नावावर सुमारे पाच कोटी रुपयांची बिले तयार केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी प्रशासनावर पर्यावरणाची हानी केल्याचाही आरोप केला आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, खोदकाम आणि त्यातून जीवसृष्टी व भाविकांना त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले. त्र्यंबकेश्वर परिसरात पावसामुळे पाणी साचून भाविकांना पायी चालणेही अवघड झाल्याचे ते म्हणाले.
अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांकडे कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आल्याने नियोजन विस्कळीत झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मेळ्यापूर्वी पूर्ण व्हायला हवी असलेली विकासकामे अद्याप अपूर्ण असून वेळेत पूर्ण होण्याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली.
महंत बिंदू महाराज यांनी प्रशासनाने कुंभमेळ्याचे "लुटीचे मेळ्यात" रूपांतर केल्याचा आरोप करत, संत समाजाला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याची टीका केली
दरम्यान, हे सर्व आरोप महंत डॉ. बिंदू महाराज यांनी केले असून, या आरोपांवर प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...