महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पोषक वातावरण : कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या कामाला लागा - मा. आ. डॉ. अपूर्वभाऊ हिरे

 



सिडको (प्रतिनिधी) :

 सध्याच्या शिंदे-भाजप सरकारमुळे राजकारणाचा दर्जा बिघडला आहे, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी बुथनिहाय नियोजनबध्द तयारीला लागण्याचे आवाहन मा. आ. डॉ. अपूर्वभाऊ हिरे यांनी केले. सिडको येथील भोळे मंगल कार्यालयात कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब गिते, संतोष कमोद, मकरंद सोमवंशी, विधानसभा अध्यक्षा अपेक्षा अहिरे आदी उपस्थित होते. डॉ. अपूर्वभाऊ हिरे म्हणाले की, बुथ कमिट्या या निवडणूकांचा आत्मा आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. बुथ कार्यकर्त्यांनी आपला बुथ कसा मजबुत होईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. कर्नाटक निवडणूकांनंतर देशातील राजकारणात भाजपकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज आहेत. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न रहाता बुथ मजबुत करुन निवडणूकांच्या कामाला लागणे गरजेचे आहे. 


    श्री. नाना महाले म्हणाले की, शिंदे-भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पुर्णतः दुर्लक्ष केले आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल बघता महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बुथनिहाय संघटनाबांधणीवर भर देणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी वेळ दिल्यास येणाऱ्या निवडणूका पक्षासाठी अवघड असणार नाही. सत्ताधाऱ्यांनी सर्व शासकिय यंत्रणा काबीज केल्या आहेत. सत्ता महाविकास अघाडीकडे असतांना त्यांनी शासकीय यंत्रणेचा कधीही दुरुपयोग केला नाही. मात्र सातत्याने जाहिराती देऊन लोकांच्या मनावर सरकारची खोटी प्रतिमा बिंबविण्याचे काम केले जात आहे. सामान्य लोकांच्या मनात असलेला रोष कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालातून दिसून आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सुगीचे दिवस येणार आहे. रंजनभाऊ ठाकरे म्हणाले की, बुथकमिटी सक्षमीकरणावर कार्यकर्त्यांनी भर दिला पाहीजे. बुथ कमिटीच्या कामातूनच कार्यकर्ता घराघरात पोहचतो आणि लोकांच्या मनात त्या कार्यकर्त्याविषयी अपुलकीची भावना निर्माण होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी बुथ सक्षमीकरणावर भर दिला गेला पाहीजे. धनंजय बुचडे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी



तुळशीराम भागवत, मुरलीधऱ भामरे, मनोहर बोराडे, योगेश दिवे, जय कोतवाल, धोंडीराम आव्हाड, मांगीलाल महाले, विश्वनाथ सोनवणे, संतोष सोनपसारे, जिभाऊ बच्छाव, रमाकांत देसले, देवचंद केदारे, किरण शिंदे, जगदीश काजळे, सुदाम पाटील, छोटुराम चित्ते, प्रकाश माळी, शरद पाटील, विनायक क्षिरसागर, सुरेश ताडगे, शांताराम देवरे, कैलास खैरनार, दिपक खैरनार, मंदाताई पाटील, संतोष हरगुडे, मधुकर पगार, संजय मोरे, संजय वाडकर, मंगला मोकळ, सुरेखा पठाडे, मंगला मोरे, सुमन महाले, मंगला पाटील, संगीता पाठक, अनंद अगले, शरद पाटील, प्रकाश माळी, रमेश शेवाळे, अंजली गोडसे, विश्वनाथ पवार, भगवान भदरगे, योगिता शिरसाठ, संजय लोखंडे, नंदाताई कुडेकर, वैशाली देशमुख, प्रभावती बैरागी, मायाताई चव्हाण, आनंद आडले, गिरिश पवार, रमेश देव, दिपक जाधव, अशोक पवार, ललिता देवरे, अंजली गोडसे, सारिका बोडके, यमुनाबाई पवार, मायावती पाटील, शहीर शेख, गणेश अहिरे, साहेबराव धोंडगे, राजेश भोसले, सुधीर पवार, गणेश फुलसुंदर, कैलास ठोके, सुरेश पवार, प्रितम पवार, अमित खांडे, बाळा अमृतकर, सुनिल हिरे, सिम्मी राणा आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...