कामगार हितरक्षक सभा,महाराष्ट्र मनपा अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न


 नाशिक प्रतिनिधी:

आयसीडीएस च्या अंगणवाड्या नाशिक महानगर पालिका क्षेत्रातून बंद करा - सभानायक किरण मोहिते यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

नाशिक महानगर पालिकेने १९९३ पासून मनपा क्षेत्रात एकुण ४१९ अंगणवाड्या सुरू केल्या आहेत,यामध्ये एकात्मिक महिला व बाल विकास विभागानेही जवळपास २०० अंगणवाड्या सुरू केल्या आहेत एकाच शहरात दोन शासकिय यंत्रणा सारखाच प्रकल्प राबवित असल्यामुळे विद्यार्थी पटसंख्या मिळवण्यासाठी मनपा अंगणवाडी व आयसीडीएस च्या अंगणवाड्यामध्ये संघर्ष निर्माण होत आहे,त्यामुळे नाशिक महानगर पालिका आयुक्त यांनी आयसीडीएस च्या अंगणवाड्या महानगर पालिका क्षेत्रातून हद्दपार कराव्यात,अशी जोरदार मागणी निवेदनाव्दारे केली आहे.यावेळी कोरोना योध्दा दिवंगत योगिता बोरसे व कुंदा दळवी यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली,याप्रसंगी दिवंगत योगिता बोरसे याचे पती लहिरेभाऊ उपस्थित होते.


आज ६ जुलै २०२३ रोजी कामगार हितरक्षक सभा,महाराष्ट्र या अंगणवाडी कर्मचारी संघटनेची मिटिंग कविवर्य नारायण टिळक वाचनालय,त्रंबकनाका येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कामगार हितरक्षक सभा,महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करीत होते.यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्यांबाबत चर्चा केली व या समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या वतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते, याप्रसंगी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निरसन होण्यासाठी मा.आयुक्त यांना निवेदन देण्याचे एकमताने ठरले.व त्यानुसार आयुक्तांना खालिलप्रमाणे निवेदन देण्याचे ठरले.



🛑 *निवेदनातील विविध मागण्या*

१) अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन अतिशय तुटपंजे असून आजच्या महागाईच्या तुलनेत जीवन जगण्यास अतिशय कठिण आहे,तरी अंगणवाडी मुख्यसेविका यांना ₹.१५०००/-,अंगणवाडी सेविका - ₹.१०,०००/- व अंगणवाडी मदतनीस ₹.९८००/- एवढे मानधन देण्याची तरतूद करण्यात यावी.

२) २०१८ साली १३६ अंगणवाड्या बंद करण्यात आलेल्या होत्या,त्यापैकी १४ अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत,उर्वरित १२२ अंगणवाड्या ही सुरू करण्यात याव्यात.


३) कोरोना काळात कामावर हजर होण्यास असक्षम असणाऱ्या २० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेत रूजू होण्यासाठी एक संधी द्यावी.

४) कोरोना काळात सक्तिने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मनपा वैद्यकिय विभागाने कोरोनाग्रस्त रूग्णांच्या भागात सर्वेक्षण करावयास लावले,यात सर्वेक्षण करतांना सातपूर विभागातील अंगणवाडी कर्मचारी दिवंगत योगिता बोरसे व पंचवटी विभागातील दिवंगत कुंदा दळवी यांना आपला जीव गमवावा लागला आहे,या दोघींच्या कुटुंबियांना शासनाने जाहिर केलेल्या ₹.५०,०००००/- लाख रूपयांची मदत आजपर्यंत केली नसून ही अतिशय लाजिरवाणी व अमानवतावादी बाब आहे.तरी दोन्ही परिवारास त्वरित आर्थिक मदत देण्यात यावे.

५) आयसीडीएस च्या अंगणवाड्या नाशिक महानगर पालिका क्षेत्रात न चालविता,त्या अंगणवाड्या ग्रामीण भागात चालवाव्यात,नाशिक महानगर पालिका क्षेत्रात फक्त नाशिक महानगर पालिकेनेच अंगणवाडी प्रकल्प चालवावा,कारण एकाच ठिकाणी दोन शासनयंत्रणा कार्यरत असणे अयोग्य आहे.याबाबत नाशिक महानगर पालिकेने ठोस भूमिका घ्यावी.

६) अनेक मनपाच्या अंगणवाड्यामध्ये मूलभूत सुविधा व शैक्षणिक साहित्याचा अभाव आहे, तसेच काही ठिकाणी अंगणवाडी चालविण्यासाठी जागा उपलब्ध नाही,याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मनपा विभागिय अधिकारी यांनी योग्य ते सहकार्य करावे.


७) मनपाच्या सहाही भागातील अंगणवाड्यांवर ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्या जागा रिक्त आहेत,त्या त्वरित भरण्यात याव्यात,तसेच बदली करीता आलेले अर्ज विचारात घेऊन मंजूरी द्यावी.

वरिलप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून विविध समस्यांबाबत निवेदन मनपा आयुक्त यांना सादर करण्यात आले.



या बैठकित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष - किरण मोहिते,सचिव - चैताली भालेराव -खजिनदार - कृष्णा शिंदे, सदस्य-सुशिला साळवे , खतिब,सविता लोखंड,  धनगर, शोभा सोनार - सदस्य - सुनिता भोईर*

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...