नाशिकच्या मविप्र विधी महविद्यालयात फडकला ७६ फुटांचा तिरंगा


 नाशिक प्रतिनिधी :

नाशिक, १५ ऑगस्ट : नाशिकच्या गंगापूर रोडवरील मविप्र विधी महविद्यालयाने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्षपूर्तीनिमित्त ७६ फुट लांबीचा तिरंगा फडकावून विक्रमी कामगिरी केली आहे. संबंध देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना मविप्र विधी महाविद्यालयाने केलेल्या या आगळ्या वेगळ्या कामगिरीने नाशिक शहरात प्रथमच एका विधी महाविद्यालयाने भव्य तिरंगा फडकविला आहे .  


कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते होऊन भारतीय राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करून उपस्थितांना यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत प्रतिज्ञा व पंचप्रण प्रतिज्ञा देऊन भारतास आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्याकरिता शपथ ग्रहण करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. 


काही विद्यार्थ्यांनी यावेळी विविध भारतीय संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे पारंपारिक पोशाख परिधान करून 'विविधतेतील एकतेचा' संदेश दिला. या ऐतिहासिक प्रसंगाच्या वेळी एमव्हीपी  विधी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाला उत्स्फूर्त स्वरुप प्राप्त करून दिले. यावेळी मविप्र च्या संपूर्ण कॅम्पसमध्ये देशभक्तीचा सर्वोच्च आनंद आणि अभिमानाचा सामूहिक भाव दिसून येत होता. 


स्वातंत्र्यदिनी प्रथमच ७६ फुटांचा तिरंगा फडकल्याने नाशिक शहरातील मविप्र विधी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव विधी महाविद्यालय ठरले आहे, यामुळे मविप्र विधी महाविद्यालयाच्या या  विक्रमी कामगिरीने संपूर्ण दिवस मविप्र विधी महाविद्यालयावर विविध समाजमाध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...