संपादकीय : जनार्दन गायकवाड
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नासिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी, नाशिक शहर परिसरात प्राण घातक शस्त्र तसेच अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेण्यासाठी आदेश काढलेले आहेत. त्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशन कडील गुन्हेशोध पथक कार्यान्वित असताना, पथकातील पो.शि. संदीप भुरे यांस गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की एक संशयित इसम, हा म.न.पा. शाळा गणेशचौक सिडको नाशिक येथे बेकायदेशीर रित्या विनापरवाना गावठी कट्टा त्याच्या कमरेला बाळगून उभा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, पोलीस शिपाई सागर जाधव, पोलीस शिपाई घनश्याम भोळे यांनी सापळा रचून, संशयित नाव - राजन कुमार गुलाबचंद कहार. वय ४१ वर्ष, रा. गणेश रोबंगलो नंबर ०४, प्रसन्न नगर,पाथर्डी फाटा नाशिक असे सांगितले, त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. यावर त्याला ताब्यात घेऊन अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माननीय न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असता. त्याला २० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
नमूद गुन्ह्याचा तपास हा नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०२ श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस ठाणे प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक अशोक नजान (गुन्हेशाखा) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, पवन परदेशी, सचिन करंजे, राकेश राऊत, प्रवीण राठोड,सागर जाधव, अनिल गाढवे, यांनी कारवाई केली असून. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमिला कावळे करीत आहेत.

Post a Comment