संपादक - जनार्दन गायकवाड
नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून टाकणारी कारवाई मुंबई साकीनाका पोलिसांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्यानंतर नाशिक पोलिस देखील सतर्क झाले असून आज दिवसभरात शिंदे पळसे भागात शोध घेऊन नाशिकरोड पोलिसांनी आणखी एक गोडाऊन हुडकून काढले आहे. साकीनाका पोलिसांच्या कारवाईनंतर शिंदे गावात या आधी सील केलेल्या कारखान्यापासून नजीकच्या एका गोडाऊनमध्ये एमडी तयार करण्यासाठी वापरला जाणारा कोट्यावधी रुपयांचा कच्चा माल नाशिकरोड पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक चर्चा असली तरी पोलिसांकडून मुद्देमालाबाबत अधिकृत आकडेवारी मात्र सांगितली गेली नाही. अजून कारवाई सुरूच असून कारवाई पुर्ण झाल्यानंतरच खरा आकडा बाहेर येईल.
मुंबई पोलिसांनी नाशिक शहरात एमडी या ड्रग्स वर केलेल्या मोठ्या कारवाईनंतर, नासिक शहर पोलिसांकडून लाजेकाजे, कारवाई करून उघड पडलेले पितळ झाकायचा लाजिरवाना प्रयत्न,
नाशिक शहरात काल शिंदे गाव येथे ( मुंबई पोलीस ) साकीनाका पोलिसांनी 300 कोटीचा एमडी ड्रग्स हा मुद्देमाल जप्त केला. तर आज नाशिक पोलिसांनी शिंदे येथे 250 कोटींच्या आसपास एमडी ड्रग साठी वापरला जाणारा कच्चा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन दिवसांमध्ये नाशिक शहरात जवळपास ५५० पेक्षा जास्त कोटींचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
आपले आर्थिक संबंध जोपासत, खाकीच्या आतले खिसे भरून नाशिक शहरातील भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तरुण पिढीला एमडी सारख्या ड्रग्सच्या जाळ्यात अडकवण्यात हातभारच लावलेला आहे. एक संपूर्ण तरुण पिढी संपवण्याचा हा मोठा कट असून, हजारो रुपये पगार घेणाऱ्या या भस्मासुरांचे पोट हजार,दहा हजार अशे हप्ते घेऊन भरेल का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
कायद्याचा आणि आपल्या खुर्चीचा गैरवापर करून काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी मिळून या अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचे व इमानदारीने काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कुचंबना करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
आजच्या परिस्थितीत नासिक पोलीस आयुक्तांचे आदेश झुगारून कित्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका, जुगार, आड्डे स्थानिक पोलिसांच्या वरद हस्तामुळे सुरूच आहेत, नाशिक शहरात १३ ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत आसपास असणारे मळेशिवार, हॉटेल्स, फ्लॅट यामध्ये अवैद्यधंदे सर्रास सुरू आहेत, यांच्यावर वरदहस्त कोणाचा ?
हा सर्व प्रकार बघता मात्र *जिसकी लाठी उसकी भैस* ही म्हण अगदी बरोबर असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आता नाशिक शहर पोलिसांची, गेलेली इज्जत परत मिळवण्यासाठी काय पावले उचलतात हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment