अज्ञात प्रेताची ओळख पटली. न्यायडोंगरी एकाच महिन्यात सलग तिसरा खून...


मुख्य संपादक: जनार्दन गायकवाड

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात खुनाचे सत्र सुरच, काल रात्रीच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याचे उघडकीस आले त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

एका महिन्याच्या काळात न्यायडोंगरी गावात पुन्हा तीसऱ्या खुनाची घटना घडल्याचे उघड झाल्याने न्यायडोंगरी गाव हदरून गेले आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका घटनेत मुलाच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले होते.

तर दुसऱ्या घटनेत पंचवीस लाख रुपयांसाठी डॉक्टर पतीने वडिलांच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवले होते या घटना ताज्या असतानाच

 आज न्यायडोंगरी येथे अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली आहे. न्यायडोंगरी ते परधाडी रोडच्या कडेला असलेल्या शेती गट नंबर 847/3 या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असुन, खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मयताची ओळख पटवून या व्यक्तीचा खून कोणी केला व का केला याचा तपास करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.
 दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड येथील उप विभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, नांदगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी घटना स्थळाला भेट दिली. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सांगितले आहे.

 आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीची ओळख पटली असून सदर व्यक्ती हा मध्यप्रदेश येथील एक मजूर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय त्याच्या इतर नातेवाईकांनाही शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...