नाशिक इंदिरानगर येथील डे केअर सेंटर शाळेत आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक वैचारिक दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधीनी सकारात्मक ऊर्जेसाठी पणत्या प्रज्वलित केल्या, तसेच मूड मॅप रंगविले. सोबत सर्वांसाठी "ये मत कहो खुदा से मेरी मुश्किल है बडी है " हे सुंदर मंत्रमुग्ध करणारे व सकारात्मकता निर्माण करणारे गाणे लावण्यात आले.
प्रमुख अतिथी परिचय,स्वागत व सूत्रसंचालन सौ अनुजा ताई पाठक यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी मा. श्री हिंगणे सर ( एम ए मराठी बीएड आरंभ कॉलेज उपप्राचार्य ) मा सौ वासंती ताई पाठक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग प्रमुख ), सौ छाया ताई निकम, भास्कर दादा पवार होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुखांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत मा सौ वासंतीताई यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत, सहकारी ताई दादांचे, उपस्थित विद्यार्थी स्वागत केले. आजच्या पर्यावरण पूरक वैचारिक दिवाळी साजरा करण्याचा व आयुष्यभर दिवाळी प्रेरणादायी व्हावी यासाठी आजच्या कार्यक्रमाचा हेतू सांगितला.
प्रमुख वक्ते मा.श्री हिंगणे सर आपला व्याख्यानाचा विषय मुक्तमंथन अंतर्गत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनातील प्रसंग सांगून व्यक्तिमत्व विकासासाठी गुणात्मक भर घातली. मातृभाषा आलीच पाहिजे अशी भूमिका मांडली. शिक्षकाची महत्वपूर्ण भूमिका त्यांनी गोष्टी रुपात मांडली. शिक्षक विद्यार्थी गुण पारखून त्याला वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. मराठी प्रमाणभाषा बोलताना, लेखन करताना होणाऱ्या चुका दुरुस्ती पण सांगितली.
विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सौ अनुजा ताई यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागातील सर्व ताई दादांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post a Comment