दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरणाच्या भरावाच्या किनारी आढळला मृतदेह
किशोर दगू उशीर (वय 26, रा. खडकजांब, ता. चांदवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, लोखंडेवाडी शिवारात असलेल्या पालखेड धरणाकडे जाणार्या कच्च्या रस्त्यावर व धरणाच्या भरावाच्या दगडांवर किशोर उशीर याच्यावर अज्ञात संशयतांनी धारदार हत्याराने कपाळावर खोलवर वार केले. तसेच तोंडाला, जबड्याला, दोन्ही डोळ्यांना, चेहर्यावर, गालावर, डोक्यावर गंभीर वार करून त्याचा खून केला.
तदपच्छात मृतदेह लोखंडेवाडी शिवार पालखेड धरणाच्या भरावाच्या आत ओढत नेवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत सुरेश सुधाकर कांडेकर, वय 39 रा. खडकजांब (मृताचे नातेेेेेवाईक) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकर्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयतास ग्रामीण रुग्णालयात रात्री शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. मात्र नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत.

Post a Comment