नाशिकचे महेश वाघ यांचा जगन्नाथ पुरी येथे सत्कार


 नाशिक/ प्रतिनिधि -- भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून उत्कृष्ठ विमाप्रतीनिधी म्हणून व्यवस्थकिय संचालक सिद्धार्थ मोहंती विभागीय अधिकारी बी एस मिश्रा यांच्या हस्ते महेश वाघ यांना जगन्नाथ पुरी येथे सत्कार करण्यात आला.

             विमा व्यवसायात येत असलेल्या विविध आव्हानं लीलया पेलत सलग तीन वर्षापासून प्रतिष्ठेचा समजला जाणारा मिलियन डॉलर राऊंड टेबल (USA MDRT) पुरस्कार गेल्या चार वर्षांपासून महेश वाघ हे सातत्याने काम करून मिळवत असून नुकत्याच एल आय सी च्या काही स्पर्धांमध्ये त्यांनी हिरारीने भाग घेत त्यात ते यशस्वी झाले होते. त्या वीजेत्याना जगन्नाथ पुरी येथे भारतातील नामवंत विमाप्रतीनिधीचे पार पडलेल्या एका सत्कार समारंभात विमाप्रतिनिधी महेश वाघ यांना सपत्नीक एल आय सी चे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ मोहंती, वेस्टर्न झोन मॅनेजर बी एस मिश्रा यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यांच्या या पुरस्कार बाबत नाशिक गडकरी चौक शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी संजय पराते,शाखाधिकारी समीर बेलन, विकास अधिकारी महेश गोरवडकर यांचे विशेष सहकार्य लाभले होते.त्यांना मिळालेल्या या पुरस्कार चे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...