मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड): नवीन नासिक - मकरसंक्रांत एक सण म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. आणि त्याच दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी *तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला* अशा प्रकारचे ब्रीदवाक्य वापरून नागरिक एक दुसऱ्याला तीळ आणि गूळ देऊन नववर्षाची सुरुवात ही गोडी गुलाबी ने करत असतात. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून मकर संक्रांतीच्या दिवशी आकाशात पतंग उडविण्याची एक प्रथादेखील प्रचलित आहे. पूर्वीच्या काळी जे पतंग उडवले जात होते. त्या पतंगांना साधा दोरा वापरला जात होता. त्यात काही दिवसानंतर पतंग कापाकापीची प्रथा नवीन सुरू झाली. काही लोक आपली पतंग दुसऱ्याच्या दोऱ्याने कापली जाऊ नये म्हणून तो, दोरा पक्का अजून पक्का कसा करता येईल याकडे वळायला सुरुवात झाली. परंतु म्हणतात ना,विनाशकाले विपरीत बुद्धी ही काही विचित्र लोकांच्या डोक्यात शिरली, आणि त्यातून निर्मिती झाली नायलॉन मांजाची, आणि याच नायलॉन मांजाने पशु,पक्षी, प्राणी आणि माणसांचे जीव घेण्यास सुरुवात केली.नायलॉन मांजामुळे, नाशिक शहर तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, लहान मुलांच्या माना कापल्या गेल्या, दुचाकी सॉरांच्या माना कापल्या गेल्यात, त्यात काही व्यक्तींचा मृत्यू देखील झालेला आहे. अनेक पशुपक्षी घायाळ झालेत, मृत्युमुखी पडले. याला जबाबदार कोण ? एकीकडे प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना. हा नायलॉन मांजा बाजारात उपलब्ध कसा काय होतो ? पोलिसांकडून असा मांजा कोणाकडे आढळल्यास त्याच्यावर कारवाई होते. तरीही हा नायलॉन मांजा या पतंगबाजानकडे येतो कुठून? त्यातल्या त्यात अजून म्हणजे पतंग उडवणारे उडवतात, पतंग कटल्यानंतर तिला पकडण्यासाठी लहान मुले रस्त्यावर त्या पतंगीच्या मागे सैरावैरा पळत असतात. त्यातून देखील त्यांचे रस्त्यावर अपघात होतात याला जबाबदार कोण? हे व्यावसायिक, प्रशासन, की आपण स्वतः, या गोष्टीचा नागरिकांनी आपल्या घरापासून विचार करण्याची वेळ मात्र आता आलेली आहे. आज एक असाच दुर्दैवी प्रकार नवीन नाशिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे घडला. एक घार आकाशात उडत असताना एका नायलॉन दोऱ्यात अडकून, तिचे उजव्या बाजूचे पंख खूप मोठ्या प्रमाणात कापल्यात जाऊन, ती उंच आकाशातून जमिनीवर धाराशाही पडली, सुदैवाने रस्त्यावरून जात असणाऱ्या दोन युवकांस १) सागर सोनवणे,२) सौरव खरात यांना दिसले असता त्यांनी लवकर पत्रकार जनार्दन गायकवाड यांना कळविले. आणि तिचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. पत्रकार जनार्दन गायकवाड यांनी तात्काळ पशुपक्षी मित्र प्रथमेश यास बोलावून घेऊन, त्या पक्षाला वैद्यकीय चिकित्सा मिळावी म्हणून इरिगेशन येथील प्राणी इस्पितळात दाखल केले.

Post a Comment