नवीन नाशिक प्रतिनिधी : वारंवार किरकोळ कारणावरून मुलगी घर सोडून जात असल्याचा संताप अनावर झाल्याने पित्यानेच मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना एक्सप्लो पॉईंट जवळील रामकृष्ण नगर येथे घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ज्योती रामकिशोर भारती (२४) ही घरात झालेल्या किरकोळकारणाच्या भांडणावरून घर सोडून निघून जात असे याचा तिच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत असल्याने तिचे वडील रामकिशोर भारती यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी राहत्या घरात ज्योती हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती समजताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक किरण शेवाळे उपनिरीक्षक नाईद शेख आदींसह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी संशयित रामकिशोर यांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Post a Comment