ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित नाशिक ,डे केअर सेंटर इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या स्नेहसंमेलन प्रसंगी "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव " ही संकल्पना विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य पूर्वीचा भारत व स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली सर्व क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन नृत्य व नाट्यातून सादर केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एस.एस.सी बोर्ड येथे सहसचिव पदी कार्यरत असलेल्या मंदाकिनी देवकर व सारडा कन्या विद्यालयाचे शिक्षक सूर्यभान जगताप हे उपस्थित होते. यावेळी या संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, सहसचिव ॲड.अंजली पाटील, अधीक्षिका डॉ.मुग्धा सापटणेकर, इंग्रजी विभागा च्या मुख्याध्यापिका विद्या अहिरे, वेदश्री पाटील उपमुख्याध्यापक राम जाचक, मराठी माध्यमिक व ज्युनी. कॉलेजचे मुख्याध्यापक शरद गीते, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी मरवट, आनंदवन बाल मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका पूनम सोनवणे व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. अंजली पाटील यांची महाराष्ट्र फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच या शाळेचे क्रीडा शिक्षक कौस्तुभ रावळ , तसेच या शाळेतील विद्यार्थी राधेश परदेशी यांचा देखील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासोबत , खेळ, नाट्य नृत्य या सारख्या सुप्त गुणांना जोपासण्या बद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संस्कृती जोपासत वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्याचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱी व पालकांनी देखील सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या शाळेतील विद्यार्थी अर्णव देशमुख , समृध्दी सोनवणे, श्रेया कडाळे, जानवी भालेराव यांनी केले. सूत्र संचलना साठी सोनाली ढवळे व अंजली देवपूरकर
यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment