शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने अंबड पोलीस स्टेशन तसेच पेठे हायस्कूल येथे निवेदन

 


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ):                             नवीन नासिक, त्रिमूर्ती चौक येथे असणाऱ्या ( पेठे हायस्कूल उंटवाडी ) या शाळेत दिनांक ०६/०१/२०२३ रोजी एक अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे, संशयित नाव- रवींद्र नकारे या पि टी शिक्षकाने, त्याच शाळेत शिकत असलेल्या दहा वर्षाच्या मुली बरोबर घृणास्पद, गैरवर्तणूक करून, शिक्षकी पेशाची अब्रू वेशीवर टांगलि आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना नासिक पश्चिम महिला आघाडी सिडकोच्या वतीने, अंबड पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या फरार असलेल्या नराधमास, शोध लावून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणीचे निवेदन देण्यात आले. आणि अशाच प्रकारचे दुसरे निवेदन हे पेठे हायस्कूल उंटवाडी येथे जाऊन शाळेचे मुख्याध्यापक, व व्यवस्थापक मंडळ यांनाही देण्यात आले. या प्रकरणात सावता नगर येथे राहणारे, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सीमाताई सोळुंके, आणि तुषार सोळुंके या पती-पत्नीने सामाजिक कार्यकर्ते आणि याच शाळेच्या परिसरातील स्थानिक नागरिक असल्यामुळे बराच पाठपुरावा करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती शोभाताई मगर, सीमाताई सोळुंके शोभाताई गटकळ, मंगलाताई भास्कर, कीर्ती जावखेडकर, स्वाती पाटील, नयनताई घोलप, योगिताताई गायकवाड, लैला तांबोळे, सुवर्णा काळोखे,माधुरी पाटील, द्वारका गोसावी, शितलताई, फेमिदा रंगरेज सह अनेक महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तसेच त्रिरिमर्ती चौक परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, तुषार सोळंके  यााााा महिलांसह उपस्थित होते.संशयित आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, अंबड पोलीस स्टेशनचे psi हरिसिंग पावरा संशयित आरोपीचा शोध घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...