पवन नगर परिसरात नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांचा अचानक पाहणी दौरा


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड) :                            नवीन नाशिक पवननगर भाजी मार्केट , नवीन नाशिक आणि सातपूर महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी पवन नगर, परिसरात संध्याकाळी ७:०० वाजेच्या सुमारास अचानक पहाणी दौरा, बऱ्याच दिवसापासून महानगरपालिकेत अतिक्रमण संदर्भात असतील,किंवा स्वच्छता संदर्भातील बऱ्याच तक्रारी येत होत्या. त्याच अनुषंगाने विभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पवन नगर भाजी मार्केटमध्ये अचानक येऊन परिस्थितीची पाहणी केली असता. भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या दुकानाच्या आसपास पडलेला भाजी पाण्याचा कचरा व्यवस्थापनाच्या सूचनाही केल्या. अचानक आलेल्या अधिकाऱ्यांना बघून भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी, भाजी मार्केटमध्ये एक स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. अशा प्रकारची मागणी केली . आपण या संदर्भात महापालिकेत निवेदन द्या, तुमच्या असणाऱ्या योग्य मागणीला महानगरपालिका नक्कीच विचार करेल, आणि आपला स्वच्छतेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू अशा प्रकारचे आश्वासन दिले. यावेळी भाजीपाला व्यवसायिकांनी डॉ. मयूर पाटील यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मार्केटच्या बाहेर रस्त्यावर वाहनांच्या रांगास रांगा बघून, वाहतुकीची होणारीकोंडी लक्षात घेता, आपली दुकाने सोडून जे व्यवसायिक रस्त्यावर अतिक्रमण करीत होते, त्यांनाही चांगलीच तंबी दिली, त्याचप्रमाणे पवन नगर स्टेडियम येथे जाऊन, स्वच्छतागृहाची पाहणी केली, तसेच स्टेडियमच्या आत मध्ये,नागरिकांना खेळण्यासाठी असणाऱ्या जागेवर काही बहाद्दरांनी स्वतःची वाहने पार्क केल्याचे बघून, यांच्यावरही लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे सांगितले, विभागीय अधिकाऱ्यांना ग्राउंड मध्ये पाहणी करत असल्याचे बघून, तेथे देखील स्थानिक काही नागरिकांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.आणि परिसरातील काही अडचणी मांडल्या, पवन नगर स्टेडियम मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी आहे ती कित्येक दिवसांपासून स्वच्छ झालेली नाही, स्वच्छतागृहात व्यवस्थापकाकडून पाण्याचा अतिशय गैरवापर होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. याबाबतीत आपण लवकरात लवकर स्वच्छतागृहात व्यवस्थापक असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू, पिण्याच्या पाण्याची टाकी लगेचच साफ करून द्यायला संबंधित विभागाला आदेश दिले. या सर्व घटना बघता एक जबाबदार अधिकारी कसा हवा. आणि डॉ. मयूर पाटील हे नागरिकांमध्ये इतके लोकप्रिय का झालेत हे लक्षात येते. धडक मोहीम आणि कडक कारवाई, म्हणूनच काही लोक त्यांना दबंग अधिकारी म्हणूनही संबोधतात.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...