मुख्य संपादक जनार्दन गायकवाड :
नवीन नाशिक अंबड पोलिसांच्या हद्दीत, रंगपंचमीच्या दिवशी दि.१२ मार्च 2023 रोजी, टवाळखोर गुंडांकडून परासऱ्यातील नागरिकांना आणि पत्रकारांना शिविगाळा केली जाते. नागरिक ही रोजचीच बाब असल्यामुळे, आणि उद्या परत हे गुंड त्रास देतील यामुळे पोलिसात तक्रार दाखल करत नाहीत. आणि हा प्रकार साईबाबा नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम च्या समोर शिवम बार देशी दारू दुकानाच्या आवारात नेहमीच होतो. महिला असतील, मुली असतील,ज्येष्ठ नागरिक असतील. हे सर्व लोक, संध्याकाळच्या वेळेस या स्टेडियम मध्ये फिरण्यासाठी येत होते. परंतु या गुंडांच्या त्रासाला कंटाळून आता कोणीही येत नाही. या परिसरात वावरण्यापासून घाबरतात.
याचेच ताजे उदाहरण आपणा समोर आहे. स्वतः पत्रकारांनी पोलिसात दाखल केलेलि तक्रार, किरकोळ स्वरूपात घेतली जाते. पाच दिवस उलटून गेले तरीही, आरोपींवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. एन सी वर ज्या तपासी अधिकाऱ्यांकडे तपास असतो, त्यांनाच पाच पाच दिवस विषयी माहिती नसतो. त्यानंतर एन सी वर नमूद केल्यानुसार तपासी अधिकारी बनतोडे त्यांच्याकडे तक्रारदाराने चौकशी केली असता ते दुसऱ्या एका तपासी अधिकाऱ्याचे नाव सांगतात. अंबड पोलीस स्टेशन हवालदार शिरोले. तपासी अधिकारी शिरोले यांना याबाबत माहिती विचारले असता, तपासी अधिकारी शिरोळे सांगतात उद्या दहा वाजता पोलीस स्टेशनला या काय प्रकरण आहे बघू.याचा अर्थ काय लावायचा.
घडलेल्या प्रकाराच्या दिवशी १२ फेब्रुवारी, db शाखेचे पोलीस कर्मचारी जागेवर गुन्हेगाराची गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा करतात. गाडी तीन दिवस अंबड पोलीस मध्ये जमा राहते. परंतु या गुंडांना अभय देणारे, त्यांच्यापेक्षाही मोठे असलेले गावगुंड मटके जुगार चे आड्डे चालवणारे, काही चिरीमिरी घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पोलिसांनी मेहनतीने आणलेली गाडी परस्पर घेऊन जातात ज्याची कल्पना तपासी अधिकाऱ्यांनाही नसते असे कोणालाही पटणार नाही. त्यामुळे एकीकडे अंबड पोलीस स्टेशन मधील काही अधिकारी कायदा सुव्यवस्था कशी राखता येईल याकडे लक्ष देत असताना. मात्र त्यांच्या हाताखाली काम करणारे भ्रष्ट कर्मचारी मात्र कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यास त्यांना रस दिसत नाही.
माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, यांनी याबाबतीत सखोल चौकशी करून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा गुंड आणि चिरीमिरी साठी भ्रष्ट झालेले काही पोलीस कर्मचारी अंबड पोलीस स्टेशनला वाळवी लावल्याशिवाय राहणार नाहीत याची दखल घ्यावी. आणि असेच वातावरण अंबड पोलीस स्टेशनच्या परिसरात असले, तर मात्र पत्रकार अंबड पोलीस स्टेशनच्या परिसरात, निर्भीडपणे पत्रकरिता करू शकत नाहीत?
या प्रकरणातील सर्व पुरावे महाराष्ट्र माझा न्युज कडे आहेत.

Post a Comment