ठाकरे गटात गळती सुरूच,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज मालेगाव येथे होणाऱ्या सभेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असतानाच. नाशिकमध्ये शिंदे गटाने शिवसेनेला खिंडार पाडलेले आहे. ठाकरे गटातील काही पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले. आज शिंदेगटात प्रवेश केलेल्या चार माजी नगरसेवकांसह काही महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांचा, देखील समावेश आहे. आजच्या प्रवेशातून संपर्कनेते संजय राऊत यांना शिंदे गटाने धक्का दिला आहे.
कारण अवघ्या दोन दिवसाआधी संजय राऊत नाशिक शहरात होते. या कालावधीत असे काय गौड बंगाल झाले. की ठाकरे गटातील ही मंडळी नाथांच्या मार्गावर वळाली..
आज मालेगाव येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होत आहे. आणि त्यासाठी जय्यत तयारी सुरु असतानाच मात्र नाशिकमधील ठाकरे गटाला सुरुंग लागला आहे. आज मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यात माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे, सुदाम कोंबडे आणि श्यामला दिक्षित तसेच माजी उपमहानगर प्रमुख शरद देवरे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शोभा गटकळ, शोभा मगर, मंगला भास्कर, ज्योती देवरे, शशिकांत कोठुळे, अनिता पाटील, आशा पाटील, सीमा पाटील यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्क प्रमुख सुर्यकांत लवटे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment