⚡ ब्रेकिंग News

तोतया अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची बतावणी करून बेकरी व्यवसायिकाची फसवणूक दोघांसह एका महिलेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


 प्रतिनिधी प्रवीण कासार 

नाशिक -: अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिला आरोपीसह तीन जणांनी बेकरीचा परवाना रद्द करण्याची व व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत व्यावसायिकांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप आहे.या प्रकरणातील तिघाही संशयीतांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान या प्रकरणातील दोघे संशयीत एका खाजगी लोकल न्युज चॅनलचे कॅमेरामन आणि प्रतिनिधी तर सदरील महिला एका संस्थेची पदाधिकारी असल्याचे समजते 

याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारगिल चौक, दत्तनगर येथील एका बेकरीत १९ जून रोजी सकाळी दोन पुरुष आणि एक महिला आले. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे बनावट ओळखपत्र दाखवून दुकानातील खाद्यपदार्थांचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर बेकरीचा परवाना रद्द करण्याची तसेच दुकान बंद करण्याची धमकी देत संबंधित व्यावसायिकाकडून १५ हजार रुपये रोख आणि तीन हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतल्याचा आरोप आहे.तसेच

याच दिवशी दुपारी द्वारका परिसरातील आणखी एका व्यावसायिकालाही खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती दाखवून १५ हजार रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रिजवान इब्राहिम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन चांगदेव गव्हाणे (रा. महाकाली चौक, सिडको), विजय चुनीलाल बागुल आणि राजनंदिनी उर्फ रागिणी संतोष अहिरे (रा. जेलरोड, नाशिकरोड) यांच्याविरुद्ध फसवणूक व खंडणी उकळल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...